अमरावती स्थानिक दीप प्रतिष्ठान द्वारा संचालित मुक्तांगण इंग्रजी शाळेमध्ये रोबोटिक्स वर्कशॉपचे आयोजन 28 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आले होते. यात शाळेतील आठवी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता एम. डी.बी इलेक्ट्रोसोफ्ट या कंपनीचे श्री आकाश राठोड, श्री अर्पित अंभोरे व त्यांची चमू उपस्थित होती. यात विद्यार्थ्यांनी आपापल्या मार्गदर्शकांच्या देखरेखीत मोबाईल वरून ऑपरेट होणारी कार बनविली. मुलांना प्रत्येक पार्टची माहिती कार्यशाळेत प्रोजेक्टर वरून देण्यात आली तसेच हसत खेळत सेन्सर, ब्लूटूथ हे कसे काम करतात हे ही शिकवण्यात आले. अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये ह्या गोष्टींचा कसा उपयोग करतात तसेच भविष्यात आपण कुठे कुठे रोबोट्स वापरून आपला फायदा करून घेऊ शकतो, वेळ वाचवू शकतो हे सुद्धा समजून सांगितले गेले. एम डी बी एलेक्ट्रोसोफ्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्री मंगेश भारती व सौ.स्नेहल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीमध्ये 2012 पासून कार्यरत आहे तसेच ही कंपनी स्टुडन्ट डेव्हलपमेंट सायकलची डेव्हलपमेंट आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन रोबोट थ्रीडी प्रिंटिंग यासारख्या टेक्निकल विषयांवर वर्कशॉप म्हणजेच कार्यशाळांचे आयोजन ही कंपनी करते.
या कार्यशाळेत करिता 5,5 विद्यार्थ्यांचे गट बनविले गेले होते. Corona नियमांचे पूर्णतः पालन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य दृष्टिकोनात घेऊन हे कार्यशाळा संपन्न करण्यात आली. या कार्यशाळेत करिता उपस्थित श्री. पंडित पंडागळे सर शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.मृणाल पातकर, शैक्षणिक सल्लागार डॉ.रेणुका केवले तसेच सौ रोहिणी बोरेकर उपस्थित होत्या. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी शाळेतील शिक्षकांनी अथक प्रयत्न केले आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांना रोबोटिक्स मध्ये आवड निर्माण करण्यासाठी आपल्यालाही काही करता आले याबद्दल समाधान हे व्यक्त केले.
Robotic workshop at deeppratishthan school
robotic workshop deeppratishthan
robotic workshop deeppratishthan
robotic workshop deeppratishthan