शैक्षणिक

या जिल्हास्तरावर होणा­या उपक्रमंशिवाय तालुका स्तरावर विविध उपक्रमांचं आयोजन सातत्यांन सुरु असतं. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात तालुका शाखांनी घेतलेले उल्लेखनीय उपक्रम

 • भातकुली तालुक्याच्या वतीनं दरवर्षी जिल्हाभर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं मोठ्या प्रमाणात आयोजन, विद्याथ्र्यांच्या प्रगतीबद्दल पालकांशी चर्चा. समाजाचा उत्तम प्रतिसाद
 • अमरावती शहर शाखेच्या वतीनं उन्हाळ्यांत एक महिना वर्ग 5 ते 7 च्या विद्याथ्र्यांसाठी गणित व विज्ञान विषयाच्या मूलभूत शिक्षण वर्गाचे आयोजन
 • अमरावती शहर शाखेच्या वतीनं “इयत्ता 5 वी पासून अंशत: इंग्रजी माध्यम किती उचीत किती अनुचीत’ या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजन.
 • निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, देशभक्तीवर गीतगायन स्पर्धा, चित्र रंगवा, प्रश्नमंजुषा वगैरे स्पर्धांचे विद्याथ्र्यांसाठी आयोजन शिष्यवृत्ती परिक्षेच्या दृष्टीनं शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गाचंआयोजन
 • साने गुरुजी कथामाला अंतर्गत शिक्षकांसाठी कार्यशाळा

बालिका दिन 2007

3 जानेवारी 2007 रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त “बालिका दिन’ आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला. ज्या बालिकांनी विविध क्षेत्रात स्पृहणीय यश प्राप्त केले अशा बालिकांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती सुनंदा सावरकर (मुख्याध्यापिका, लढ्ढा हायस्कुल, अमरावती) यांना 2007 चा सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला त्यानिमित्त त्यांचा श्रीमती बोके सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षीका (मुख्याध्यापिका, कस्तुरबा कन्या विद्यालय, अमरावती) यांचे हस्ते गौरव करण्यात आला.

आधार दिनश्व्... 16 जुलै

समाजात व शाळेत विविध विशेष दिनाचे आयोजन केल्या जाते. कार्यक्रम घेतले जातात परंतु हारतुरे आणि भाषणे या पलिकडे विशेष काहीच नसते. दिवस संपला की त्या दिना मागचं औच्यित आणि गांभीर्य ही संपून जाते. दीप प्रतिष्ठान आणि दीप स्नेहीच्या जीवनात मात्र 16 जुलै भविष्यात “आधार दिवस’ म्हणून साजरा होईल. दीप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंडित पंडागळे यांनी अपंग आणि निराधार अशा 40 मुलामुलीची राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करुन त्यांना आधारच दिला नाही तर जिद्दीनं शिकण्याचं आणि मोठ्ठं होण्याचं स्वप्नही दिलं. त्या सर्व विद्याथ्र्यांना सायन्स स्कोअर शाळेत प्रवेश देऊन त्यांच्या शिक्षणाचीही व्यवस्था करुन दिली. अपंगाच्या आधार-वसतीगृहात आज 38 विद्यार्थी-विद्यार्थीनी भविष्याचीस्वप्नं बघत आणि ती साकार करण्याच्या संकल्पाने जिद्दीने प्रयत्न करित आहेत.

जागतिक महिला दिवस

दि. 8 मार्च 2007 रोजी जागतिक महिला दिवस अहिल्याबाई होळकर सभागृह, बायपास रोड, अमरावती येथे साजरा करण्यात आला. या निमित्त डॉ. श्रीमती पोटोडे यानी “स्त्रीयांच्या चाळीसीतील समस्या व त्यावरील उपाय योजना’ या विषयी उद्बोधन केले हा कार्यक्रम श्रीमती आशा बांबल, सहा. शिक्षिका, साईबाब विद्यालय, अमरावती यांनी यशस्वीपणे पार पाडले.

उद्बोधन वर्ग

दीप प्रतिष्ठानची स्थापना झाल्यावर शैक्षणिक/सामाजिक/सांस्कृतिक/क्रीडा या संबंधी विविध उपक्रम राबविण्याचे ठरले. शैक्षणिक उपक्रमामध्ये “शिष्यवृत्ती परिक्षा मार्गदर्शन व उद्बोधन’हा उपक्रम सन 2000 पासून यशस्वीरित्या राबवित आहे. जिल्हास्थळी, तालुकास्थळी शिक्षकांकरिता कार्यशाळा आयोजित करुन शहरी व ग्रामीण भागांतील शिक्षकांमधली परीक्षेसंबंधीची भिती कमी करुन त्यांचेमध्ये आत्मविश्वास निर्मितीचे महत्वाचे कार्य केले. सन 2004 मध्ये शासनातर्फे शासनाच्या ध्येय धोरणानुसार शिष्यवृत्ती परिक्षा सक्तीची करण्यात आली, त्या काळात ग्रामीण भागातील शिक्षक गोंधळून गेलेला होता- कसं होईल? काय होईल? या विवंचनेत होता. अशा या गोंधळलेल्या काळात माननीय दीपस्नेही राणेसाहेब, उपायुक्त,शैक्षणिक गुणवत्ता कक्ष, आयुक्त कार्यालय अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली अमरावती विभागातील पाचही जिल्ह्रात ठिकठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा कार्यशाळा व शिबीराचे आयोजन करुन शिक्षकांना भावनिक आधार देण्याचे महत्वाचे काम केले.

दीपस्नेही पांडुरंग सालबर्डे, सहाय्यक शिक्षक, मणिबाई गुजराती हायस्कुल, अमरावती, दिपस्नेही गजानान देशमुख, सहाय्यक शिक्षक, जि.प., अमरावती, दीपस्नेही गणेश अर्मळ, सहाय्यक शिक्षक, जि.प. अमरावती, दीपस्नेही अशोक वानखडे, सहाय्यक शिक्षक, जि.प. अमरावती, दीपस्नेही उध्दवरव वाकोडे, सहाय्यक शिक्षक, म.न.पा. अमरावती, दीपस्नेही नितीन उंडे, मोर्शि, प.स. इत्यादी शिक्षकानी मन:पुर्वक कष्ट घेऊन शहरी व ग्रामीण शिक्षकांचे उद्बोधन केले.

इतर उपक्रम

सामाजिक
 • रक्तदान शिबिर
 • वृक्षारोपण
 • गांजर गवत निर्मूलन
 • अनाथालयातील मुलांना खाऊ वाटप
 • पालक मेळावा
 • पुरग्रस्तांना मदत
 • दंत चिकित्सा शिबिर
सामाजिक
 • रक्तदान शिबिर
 • वृक्षारोपण
 • गांजर गवत निर्मूलन
 • अनाथालयातील मुलांना खाऊ वाटप
 • पालक मेळावा
 • पुरग्रस्तांना मदत
 • दंत चिकित्सा शिबिर
सामाजिक
 • रक्तदान शिबिर
 • वृक्षारोपण
 • गांजर गवत निर्मूलन
 • अनाथालयातील मुलांना खाऊ वाटप
 • पालक मेळावा
 • पुरग्रस्तांना मदत
 • दंत चिकित्सा शिबिर

विविध उपक्रमातील दीपस्नेहींचा सहभाग

बाल साहित्य जत्रा

आकांक्षा कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतींन घेण्यात आलेल्या व 25000 विद्यार्थी तसेच साहित्यिक कलावंताचा सहभाग असलेल्या बालसाहित्य जत्रेच्या आयोजनात दीपस्नेहीचा सिंहाचा वाटा.

बाल साहित्य जत्रा

आचार्यकुलाच्या वतीनं आयोजीत शिबीर जेष्ठ साहित्यिक प्राचार्य राम शिवाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हार्ट हॉस्पीटल, अमरावती येथे संपन्न. या आचार्यकुलाच्या शिबीराची धुरा दीपस्नेहींनी यशस्वीरीत्या सांभाळली.

बाल आनंद मेळावा

आकांक्षा कक्षाच्या वतीनं चिखलदरा येथे आयोजित आस्था वर्गातील मुलांसाठीच्या बाल आनंद मेळाव्यात दीपस्नेहीची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महत्वाचा सहभाग.

बाल आनंद मेळावा

राज्यस्तरीय स्मार्ट पी.टी. आढावा अंतर्गत प्रश्नमंजुषेच्यासंपूर्ण आयोजनाची जबाबदाी दीपस्नेहींकडे सोपविण्यात आली होती. दीपस्नेहीनी अतिशय दमदारपणे ही राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा यशस्वी केली.

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.

भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.

Address:-

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.
भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.