दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी दीपप्रतिष्ठान वासाहत राहटगाव येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूल मधे शहरी आरोग्य केंद्र सामान्य रुग्णालय अमरावती तर्फे एक दिवसीय कोरोना लसीकरण म्हणजेच *कवच कुंडल* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात मुक्तांगण शाळेचे संथापाक श्री पंडित पंडागळे सर, सचिव श्री वानखडे सर, श्री लुंगे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ मृणाल पातकर, शैक्षणिक सल्लागार डॉ रेणुका केवले आणि आरोग्य केंद्राची चमू उपस्थित होते. यात जवळपास 62लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. सकाळी 10.00ते संध्याकाळी 6.00 पर्यंत ही सुविधा उपलब्ध होती. याकरिता शाळेतील कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले व यशस्वी कार्यक्रम पार पडला.