आमच्या बद्दल

दीप प्रतिष्ठान चळवळीचा आलेख

अमरावती विभागाच्या शिक्षण क्षेत्रात स्वत:ला झोकून देणा­या धडपड्या शिक्षकांचे व्यासपीठ म्हणून “दीप प्रतिष्ठान’ ची स्वतंत्र ओळख एव्हाना झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात कार्य करणारी असंख्य माणसे स्वत:च्या व्यवसायाशिवाय काहीतरी करत असतात, नोकरी करणा­यांच्या जीवन जगण्याच्या इतरही त­हा असतात, कलावंत माणूस धकाधकीतही आपल्या कलेला न्याय देण्याचा प्रयत्न करीतच असतो. शिक्षण क्षेत्रातील काही कलावंत शिक्षकांना, स्वत:चा खास असा परिचय असणा­या गुणी व निव्र्यसनी शिक्षकांना एकमेकांची ओळख व्हावी, प्रत्येकाला एक दुस­याकडून काही शिकता यावं या विधायक विचारातून दीप प्रतिष्ठान जन्माला आलंय.
शासकीय स्तरावर शिक्षकांची विविध प्रशिक्षण होत असतात. विशेषता स्मार्ट पी.टी सारख्या प्रशिक्षणतुन शिक्षकांचे अनेक कलागुण प्रकर्षानं समोर आले. पुढेही विविध प्रशिक्षणातून तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करणा­या होतकरु, कलावंत तरुण शिक्षकांच्या गाठी भेटी होत होत्या. एकमेकांच्या भेटीन आंनद होत होता. नवीन काही शिकता येत होतं. शासकीय आदेशाशिवाय आपणास असंच एकत्र येणार नाही काय ? शिक्षणप्रेमीना एकत्र आणून आपल्याला समाधान व आनंद देणारं काम आपल्या स्तरावर करता येईल काय? या विचारानं काही मंडळी एकत्र आली. विचार पक्का झाला आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ. श्रीधर साळूंके यांच्या सहकार्याने पंडित पंडागळे, अपर्णा पांडे, श्याम मक्रमपुरे यांच्या कल्पेतून जिल्ह्रातील निवडक 30 शिक्षकांचे व्यक्तीमत्व विकासाच प्रशिक्षण दि. 14 व 15 फेब्राुवारी 1998 ला “आरती’ अमरावती येथे आयोजित केल्या गेलं.

About-Us-Slider-Img (1)
About-Us-Slider-Img2
About-Us-Slider-Img3
previous arrow
next arrow

शिक्षकांचे व्यक्तीमत्व विकासाच प्रशिक्षण

दोन दिवसीय निवासी स्वरुपाची व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा एक वेगळाच अनुभव होता. दुरदरुन ओळख असणारे मित्र झाले. प्रत्येकातील सुप्तगुणांचा परिचय झाला. नात्याची एक वेगळीच वीण निर्माण झाली. शेवटच्या दिवशी पंडित पंडागळे यांनी एक विचार ठेवला. आपल्याला यापुढेही असंच एकत्र येता येईल काय? परस्परांकडून काही शिकता आलं तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल. सर्वांना एकत्र ठेवणारा दीप किंवा दिप सतत तेवतराहून प्रकाश देणारा असं नामकरण करावचं काय? हा विचार पुढे आला. आणि सर्वांनी त्याला मनापासून साद दिली.

शिबिर संपलं. दर महिन्यालास्वत:हून एकत्र येण्याचे निश्चित झालं. त्यामुळे हे शिबिरकधीही न संपणारं ठरलं. ही तीस डोकी काही तरी विधायक काम करण्याचा विश्वास देवून गेली. शिबिराच्या आठवणी मात्र संपल्या नाहीत. एकमेकांना भेटण्याची तीव्र ओढ निर्माण झाली. भावनिक गुंतवणूक वाढत गेली. वाढदिवसाला शुभेच्या पत्र पाठवणे, यशाच कौतुक करणं, परस्परांना मदत करणं असं पारिवारीक स्वरुप येत गेलं. या नवीन विचारान इतकं भारावल्या सारखं झालं की, 8-15 दिवस कोणाची भेट झाली नाही तर चुकल्यासारखं वाटायचं, एक कौटूबिंकजिव्हाळा निर्माण झाला. एकदा माणसं जवळ आलीत त्यांची मन जुळतील की पुढचे काम फार सोपं होतं, अतिशय विश्वासानं काम होतं. यश तर हमखास मिळतंच. तेव्हा असा सामाजिक दृष्टीकोन, शैक्षणिक भूमिका वगैरे फारशी नव्हती. स्वत:च्या व्यक्तीमत्व विकासाचा उद्देश ठेवून सर्व एकत्र आलेत. पुढच्या काळातील दीप प्रतिष्ठानचे विविध उपक्रम म्हणजे विकासाचे लक्षण नव्हे काय?
दुस­या जिल्हा स्तरीय स्मार्ट पी.टी. प्रशिक्षणाच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी दीपच्या कार्यकत्र्यांकडे सोपविण्यात आली होती. अगदी सतरंची टाकण्यापासून तर सूत्र संचालनापर्यंतची सर्व कामं अतिशय सेवाभावानं केल्या गेली. जवळ जवळ दीड महिन्याचीउन्हाळ्याची सुट्टी प्रशिक्षणात गेली, तेही मानधन न घेता. मिळणा­या मानधनातून समुहासाठी पुस्तकं खरेदी केली. याच काळात दीपस्नेही खुप जवळ आले. पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, प्प्रश्न मंजुषा सादर करतांना प्रत्येकातील कलावंत दुस­याला कळला.एक दुस­यांला कळता समुहांच हे झपाटलेपण पाहून प्रशिक्षणार्थी दीप बद्दल चौकशी करायला लागले समुहातील सहभागासाठी पुढे आले. समुहांच मानसिक बळ वाढत गेलं.

जवळ जवळ दोन वर्षां पर्यंत तीस मनांचा हा समूह कधी चिखलद­यात तर कधी नांदगावच्या खंडेश्वर मंदिरात कोणत्यातरी निमित्यानं एकत्र येत होता. सहज गप्पागोष्टी, पारिवारीक हितगुज व्हायचं एकमेकांची सुख दु:ख वाटून घेतली जायची. समुहाला कोणतंही नांव तसं अंगवळणी पडलं नव्हतं. कामाची दिशा नव्हती. एकत्र यायचं कलागुण एक दुस­यांपुढे ठेवावे. सर्वांनी दाद द्यावी कला फुलत जावी. शिकताआलं तर शिकावं. हसावं. रमांव. आपलं व्यक्तिम्त्व फुलवावं. आयुष्यातील आनंद मनसोक्त लुटावा. बस्स. एवढंच.

पुढे समुहाला निश्चित दिशा ठेवून काम करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि ख­या अर्थानं ‘दिप प्रतिष्ठान’ चा जन्म झाला. शै क्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात काम करण्यांच निश्चित झालं. स्वत:च्याव्यक्तिमत्वाला आकार देता देता समाजऋण मान्य केल्या गेलं. आफला पेशा इमानइतबारे सांभाळत आंनदासाठी व समाधानासाठी विधायक काम करण्याची चळवळ हाती घेतल्या गेली. दीप प्रतिष्ठान आता केवळ तीस व्यक्तींचा समुह राहीला नाही. ती एक चळवळ झाली. जिल्हास्तरावर सर्वांना सामावून घेणं शक्य न झाल्यानं तालुका स्तरावर शाखा कार्यान्वित झाल्या. दीपचं जाळं जिल्हाभर झालं. अमरावती जिल्ह्रांत पंधरा शाखांमधुन दीपच कार्य सुरु झाल.ं पुढे इतर जिल्ह्रातील मित्रांनीही उत्साह दाखवला आणि अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम येथेही जिल्हा शाखा कार्यन्वित झाल्या.

दीप प्रतिष्ठानच्या कार्याचा ठसा ख­या अर्थान उमटला तो ‘वेध 2000’वार्षिकोत्सवानं माजी शिक्षण संचालक मा.वि.वि चिपळूणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा वार्षिकोत्सव अभिनव ठरला. शिक्षणप्रेमीनी, मान्यवरांनी त्यांच कौतुक केलं. अगदी वेळेवर सुरु झालेला संमारंभ डोळ्याचे पारणे फेडणारा व विचाराना खतपाणी घालणारा ठरला. मान्यवरांचा परिसंवाद व वादसंवाद लक्षात राहणारा ठरला. शिक्षकाचे प्रश्न व वरिष्ठांची उत्तरं हा प्रश्ननातरांचा तास चांगलाच रंगला. गौरव-कृतज्ञता सोहळा, चिपळूणकरांचं चिंतन, पणतीच्या साक्षीन त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञेनं अवघं वातावरण भारुन गेलं. आखीव नियोजन व रेखीव आयोजनाचा एक सर्वागसुदंर सोहळा संपन्न झाला. अनेक दीप तेवतठेवण्याचं सामथ्र्य त्या सोहळ्यांन निर्माण केलं.

 

दीपच्या वाटचालीतील मार्गदर्शक

मा.सुमित मल्लिक (भा.प्र.से.) / नंदकुमार (भा.प्र.से) / विजया चौहान (युनिसेप सल्लागार) / विजय देऊस्कर (माजी शिक्षण संचालक)/ भय्यासाहेब देशमुख (माजी आमदार) / मनिषा वर्मा (भा.प्र.से) / मिलिंद म्हैसकर (भा.प्र.से.) / विनिता सिंघल (भा.प्र.से.) / डॉ.श्रीधर साळुंके/ संभाजी राणे (सहा. आयुक्त) / हर्षवर्धन सपकाळ (सामाजिक कार्यकर्ते) / सुरेश वाकोडे / ज.श्री.निवाणे.

 

दीपच्या विविध उपक्रमात सहभागी मान्यवर

संत अच्युतमहाराज / वि.वि.चिपळूणकर / डॉ.भा.ल. भोळे / सुरेश व्दादशीवर / डॉ.श्रीकांततिडके / भिमराव पांचाळे / सुषमा देशपांडे /ज्ञानेश वाकूडकर / चित्रा पालेकर / सुमित्रा भावे / सुनितल सुकथनकर / अशोकराणे / शाम पेठकर / डॉ. प्रभा गणोरकर / प्रा. राम शवाळकर / भाऊ गावंडे / तनुजा मल्लीक / प्रा.सुभाष गवाई / गाडे गुरुजी / बबन सराडकर / सतीश तराळ / प्रा. जनक कडू / प्रा. मनोज तायडे / किरणमहल्ले / मीना गावंडे / महेश करजगावकर / रामकृष्णदादा बलीरकर / डॉ. रमेश अंधारे / भास्कर मोहरील / एम.एन. कापगते / कांचनमाला गावंडे / डॉ. विवेक वाघ / प्रा. प्रविण विधळे / अंबादास मोहिते / ज्योतीमोहिते / प्रा.ना.ह. वानखडे / सुभाष राठी / प्रा. अरविंद देशमुख / सीमंतीनी धुरु / डी.आर. देशमुख / गावंडे गुरुजी / राजेश चांडक / कमल खंडेलवाल / राम इथापे / रमेश बाहेकर / गोकुलदास कामडी / बबनराव मेटकर / डॉ. अविनाश सावजी / श्रीकृष्ण काळे /बच्चुभाऊ कडू / सिंधूताईसपकाळ / शतारामबुटे / प्रा. विजय पांडे / चक्रधर घुलक्षे / पुष्पार्ता बोंडे / बाळकुळकर्णी / रघुनाथ पांडे / कुमार बोबडे / दादासाहेब बोके / प्रा. राजेन्द्र देशमुख / प्रा. राजेन्द्र देशमुख / प्रा. हेमंतमोहोड / प्रा. नयना मोहोड / श्री. बोबडे / डॉ.के.एम.कुळकर्णी(शिक्षण सहसंचालक).

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.

भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.

Address:-

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.
भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.